🕒 1 min read
नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत जगभरात लसीचे ७८ कोटींहून जास्त नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. पण असे असले तरी कोरोनाचा शेवट इतक्यात होणार नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय. आरोग्यासंबंधी कठोर उपाययोजना केल्यास काही महिन्यांत कोरोनावर नियंत्रण मिळवता येण्याची शक्यता डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात जानेवारी आणि फेब्रुवारीतील सलग सहा आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. पण मार्चच्या पहिल्या आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्या भयानक वाढली आहे. तसेच चार आठवड्यांपासून बळींच्या आकड्यांतदेखील चिंताजनक वाढ झाली असल्याचे घेब्रेयसस म्हणाले. गत एका आठवड्यात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आशिया आणि पश्चिम आशियातील काही देशांमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी जगभरात लसीकरणदेखील व्यापक पातळीवर सुरू आहे.
आतापर्यंत जगात ७८ कोटींहून अधिक कोरोनारोधी लसीचे डोस लोकांना देण्यात आले आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे; पण त्याचवेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, कोरोना चाचण्या, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे आणि क्वारंटाईन करणे, यांसारख्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे घेब्रेयसस म्हणाले.
कोरोनामुक्त झालेल्यांनी घ्यावी काळजी
कोरोनामुक्त झालेल्यांना पुढे काय झेलावे लागेल, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपण इतरांच्या तुलनेत तरुण असल्यामुळे कोरोना झाला तरी आपल्याला काहीही होणार नाही, अशा आविर्भावत राहणे चुकीचे आहे, असे नमूद करत महामारीचा अंत अजूनही खूप दूर असल्याचा इशारा त्यांनी दिला. परंतु आशावाद जिवंत ठेवण्याची जगाकडे अनेक कारणे आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करत आणि लसीकरणाचा वेग वाढवत येत्या काही महिन्यांमध्ये महामारीला नियंत्रणात आणले जाऊ शकते असे डब्ल्यूएचओने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
