🕒 1 min read
औरंगाबादः जिल्हा परिषदेचा शिक्षकांसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून नवीन नियम लावण्यात आले आहेत. जर या शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच त्यांना पगार मिळेल. अन्यथा पगारासाठी ताटकळत थांबण्याची वेळ शिक्षकांवर येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत लस न घेतलेल्या शिक्षकांची आता पाचावर धारण बसली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले नसतील तर कदाचित शिक्षकांना पगार मिळणे कठीण जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना पगार बिलासोबत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत दोन हजार शिक्षकांचा लसीचा दुसरा डोस घेणे शिल्लक होते. विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता आता शिक्षकांना दोन डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. मध्यंतरी ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र नंतर दुसरी लाट आली.
दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळू हळू कमी झाल्याने ग्रामीण भागासह शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता, मुलांना शाळेत येताना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सांगितले की, कोरोना नियमांचे पालन करताना शहरातील खासगी शाळांनीही शिक्षकांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण नसेल तर अशा शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप; म्हणाले…
- लसीकरण सरकारचीच जबाबदारी, मोदींनी त्याची जाहिरातबाजी थांबवावी-पृथ्वीराज चव्हाण
- ‘…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत’, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र
- पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- आर्यन खान प्रकरणाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; किरण गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय आर्यन?


