🕒 1 min read
कोल्हापूर : सध्या राज्यभरात धाडसत्र सुरु असून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे या धाडसत्रावरून केंद्र सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकास्त्रांचा वर्षाव केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु आहे. पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानलं असतं. पण सगळं तोडपाणी करण्याकरता हे सगळं चाललं आहे. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचे काम सुरु आहे’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, याच धाडींसंदर्भात पिंपरी-चिंचवडमध्ये बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की,’केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे.’
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’


