Share

सावधान! औरंगाबादेत आता ‘या’ भागांमध्ये फिरण्यास असेल बंदी

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये, शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपलब्ध बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. आता शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने २६ भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. आता या भागाच्या एन्ट्री पॉइंटवर बॅनर्स लावले जाणार असून, इतर भागातील व्यक्तींसाठी कंन्टेनमेंट झोनमध्ये जाण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी मंगळवारी (दि. ६) सांगितले.

शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाने नुकतीच पाहणी केली होती. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कंन्टेनमेंट झोन जाहीर करून उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान महापालिकेने १९ वॉर्ड रेड म्हणून जाहीर केले होते. मात्र कंन्टेनमेंट झोनची यादी अंतिम करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीच्या पथकावर सोपविली होती.

स्मार्ट सिटीच्या पथकाने आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून २६ भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून रविवारी (दि. ४) जाहीर केले आहेत. त्यात सहा मायक्रो, १२ मिडीयम तर आठ लार्ज कंन्टेनमेंट झोनचा समावेश आहे. यासंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, कंन्टेनमेंट झोन जाहीर झाले असले तरी या भागात अद्याप नागरिकांना वावर सुरू आहे. त्यामुळे या भागाच्या प्रवेशद्वारावर कंन्टेनमेंट झोन संदर्भात बॅनर्स लावले जातील. जेणेकरून कोणी प्रवेश करू नये.

चाचण्यांसाठी १८ टीम

कंन्टेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या चाचण्या करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी १८ स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टिमच्या माध्यमातून जास्तीत जास्त चाचण्या केल्या जातील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!