Share

महाविकास आघाडीत कसलेले फलंदाज आहेत, जरा सांभाळून; मिटकरींचा टोला

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी.बी.आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल देशमुख यांनी राजीनामा दिला.

दरम्यान,देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक आणखी आक्रमक झाले आहे. भाजपने टीकेची झोड उठवली आहे तर सरकारच्या मंत्र्यांना या घटनेमुळे उत्तरे देता देता नाकी नऊ आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला होता.

संजय राऊत हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले होते.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे. ‘सांभाळून बॉलिंग टाकायला लावा प्रसादजी, चुकुन नो बॉल पडला ना तर इकडून सुपर सिक्सर बसेल..कारण ईकडे कसलेले फलंदाज आहेत, म्हणून जरा सांभाळून!’ असा टोला मित्कारी यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!