Share

१००% मुस्लिम भाग असलेल्या हुसैन कॉलनीत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केले विकास कामाचे उद्घाटन

Published On: 

औरंगाबाद : या बातमीचे हेडिंग अनेकांना खटकले असेलच. मात्र खुद्द जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची सोशल मीडिया वरील ही पोस्ट अनेकांना खटकली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसे विकासकामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा अंबादास दानवे यांनी लावला आहे. विकास कामांचे उद्घाटन झाल्यानंतर त्याचे फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंट वर टाकले जातात. त्या मधीलच हुसैन कॉलनी मधील विकास कामाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्यात आली. मात्र यामध्ये मुस्लिम बहुल वार्डात आपण विकास कामाचे उद्घाटन करत असल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं.

दानवे यांनी केलेला पोस्टमध्ये लिहिले की, “न्यायनगर हुसैन कॉलनी भागात माझ्या विशेष आमदार निधीतून #50लाख रुपयांतून बनवण्यात येणाऱ्या सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार विकासकामे करत असतांना शिवसेना कधीच कोणाची जात, धर्म मुळीच बघत नाही, मतदान होईल का नाही हे बघत नाही तर जनतेची आवश्यकता बघतो. न्यायनगर हुसैन कॉलनी १००% मुस्लिम भाग असला तरी एक सामाजिक, विकासात्मक भावनेतून सर्व घटकाला पुढे नेत शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा हेतू असतो.”

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये “खान की बाण” हा प्रचार काही नवा नाही. मात्र, आता हा प्रचार करणारी शिवसेनाच आम्हालाही ‘खान’ हवा असा प्रचार तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. औरंगाबाद शहराची लोकसंख्या पाहता शहरात एम.आय.एम. पक्षाची ताकद चांगलीच वाढलेली दिसून येते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचे आव्हानं असणार आहे. या दोन्ही पक्षांतील दुफळीचा फायदा एम.आय.एम.ला होऊ शकतो. त्यामुळे मुस्लिम बहुल वार्डात देखील शिवसेना आतापासूनच शिरकाव करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!