लातूर: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या पादुर्भावला रोखण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर काम करीत आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. पण इंजेक्शनच्या मागणीला पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे दिसून येत.
दरम्यान, पालकमंत्री यांनी आढावा बैठक घेऊन इंजेक्शनचा तुटवडा भासू देऊ नका असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर सुद्धा इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचे दिसून येत आहे. सध्या लातूरकर इंजेक्शनसाठी पायपीट करत असून, पत्रकार, राजकारण्यांना मदत मागण्या पर्यंतच्या घटना घडत आहेत. यामुळे पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? असा प्रश्न सामन्यांना पडत आहे.
एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा भासणार नाही आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सामान्यांना इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. हे विशेष, त्यामुळे काळाबाजार होण्याचीही संभावना वर्तवली जात आहे. येणाऱ्या काळात तरी रुग्णांना इंजेक्शन मिळेल का? कि रुग्णांना राम भरवसे सोडले आहे असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- माझी जबाबदारी, मीच विसरलो…भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक टीका
- मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात देशमुखांची सुप्रीम कोर्टात २९० पानांची याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

