🕒 1 min read
मुंबई : देशात काल दिवसभरात कोविड-19 ची उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली. काल सकाळी संपलेल्या 24 तासात तब्बल 1 लाख 3 हजार 558 नवीन बाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होता तेव्हा सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ 97 हजार होती.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार राज्यात 47 हजार 288 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप असलेल्या महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब मध्ये केंद्र सरकारने 50 विशेष आरोग्य पथके रवाना केली असून, यातील 30 पथके राज्यातल्या 30 जिल्ह्यांमध्ये लवकरच दाखल होत आहेत.
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान,कोरोनाच्या विळख्यात अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परीक्षार्थी सुद्धा अडकले आहेत.यामुळेच आता हळूहळू ११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करू लागले होते.
परंतु आता परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडूंची स्वयंपाक्याला झापड; ‘आता हाच न्याय राज्यातील त्रस्त जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?’
- मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात देशमुखांची सुप्रीम कोर्टात २९० पानांची याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
