🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने देखील उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यमंत्री तथा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी हे काल अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक देखील घेतली. या बैठकीनंतर त्यांनी अचानक जिल्हा रुग्णालयात भेट दिली. जिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामुळे काल बच्चू कडू यांनी अचानक भेट देऊन सत्य परिस्थितीचा आढावा घेतला.
खुद्द पालकमंत्र्यांनी थेट रुग्णालयाची मेस गाठल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. या मेसचे कंत्राट साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर सुनिल मोरे हा कंत्राटी कर्मचारी आहेत. बच्चू कडू यांनी काही प्रश्न कंत्राटदार व स्वयंपाक्याला विचारून उलटतपासणी केली. दररोज किती तूर व मूगडाळ लागते असा प्रश्न केला असता कंत्राटदाराने २३ किलो तर स्वयंपाक्याने आठ ते दहा किलो डाळ लागते असं उत्तर दिले. त्याला पुन्हा एकदा विचारले असता त्याने वेगळा आकडा सांगितलं.
यामुळे दररोज जवळपास १२-१३ किलोचा अपहार होत असल्याचं बच्चू कडू यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी उपस्थितांना बच्चू कडू यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. इतकंच नाही तर त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. हा प्रकार आज माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/132120852203485/
राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो?
सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 6, 2021
‘अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली. हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच, ‘राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो? सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा.’ अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली.
हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 6, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- माझी जबाबदारी, मीच विसरलो…भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक टीका
- मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात देशमुखांची सुप्रीम कोर्टात २९० पानांची याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
