औरंगाबाद : रेल्वे पटरी क्रॉस करताना सावधानता बाळगावी असे वारंवार सांगूनही काहीजण निष्काळजीपणे वागतात. सुचनाकडे पाठ फिरवतात. याचाच परिणाम आत्तापर्यंत अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. असाच एक प्रकार समोर आला असून रेल्वे क्रॉस करताना ३८ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, बनेवाडी येथील राहणारा एक व्यक्ती रेल्वे पटरी क्रॉस करताना रेल्वे समोर आला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. साहेबराव उत्तमराव जगताप (वय.३८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरील व्यक्ती बनेवाडी जवळ रेल्वे पटरी क्रॉस करत असताना रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला.
घटनेचा तपास कूळमेथे हे करत असल्याची माहिती चंद्रविजय प्रधान यांनी दिली. अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी रेल्वे पटरी क्रॉस करताना काळजी घ्यावी. रेल्वे गेट बंद असतानाही काहीजण रेल्वे पटरी क्रॉस करताना इकडे तिकडे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे पटरी क्रॉस करताना सावधानता बाळगावी, विनाकारण रेल्वे पटरीवर फिरू नये असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव ; पंतप्रधान मोदी म्हणाले…
- ‘उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही ‘दहा जनपथ’ आणि ‘सोनिया गांधी’ या आहेत’
- मराठवाड्यात ‘एक्स-बँड रडार’ बसवण्याची डॉ. भागवत कराड यांची मागणी
- ‘शिवसेनेशी एकनिष्ठ राहा’, आ. अंबादास दानवे यांचा माजी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला!
- ‘ताई, तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल’; चाकणकरांच प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

