अमरावती : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या इतर नेत्यांकडूनही शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही ‘दहा जनपथ’ आणि ‘सोनिया गांधी’ या आहेत,’ अशी खोचक टीका राणा यांनी केली.
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे सातत्याने विविध मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करत असतात. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सतत संकटे येत आहेत. कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात, कोरोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू कुठं असतील तर महाराष्ट्रात, कोकणात चक्रीवादळ आले. पूर आला. अनेक गावं बुडाली. घरे बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आले. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे.’
https://www.facebook.com/RaviRanaMLA/videos/321854746315664/
‘महाराष्ट्रात विदर्भ सुद्धा आहे. येथे नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. पावसामुळे नुकसान झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट अमरावतीतून सुरू झाली. संपूर्ण देशात अमरावतीचे नाव पोहोचले. तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकले नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडे बेशरम म्हणतात. त्यामुळे ‘मातोश्री’वर बेशरमाचे झाड लावावे लागेल, असे रवी राणा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत

