Share

पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव ; पंतप्रधान मोदी म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिने ऐतिहासिक कामगिरी करता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. पीव्ही सिंधूला काल झालेल्या उंपात्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. यात तिला चायनिज ताईपाईच्या ताई झु यिंग कडून सलग दोन सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर कांस्य सामन्यात सिंधूने पुनरागमन करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे, यात तिने चीनच्या बिंग जिओ ही हीचा 21-13 21-15 असा पराभव केला आहे, यामुळे सलग दोन ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

पी.व्ही सिंधूवर सध्या विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे. ‘ पी. व्ही. सिंधू दैदिप्यमान कामगिरीमुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन, ती भारताची शान आहे आणि आमच्या सर्वात उत्कृष्ट ऑलिंपियनपैकी ती एक आहे.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमार नंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी चारचाँद लागले आहेत. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून बॉक्सर लवलीनानेही किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!