🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा, कन्नड-सोयगाव तालुक्यात असलेल्या करंजखेड्यातील शिवसैनिकांशी शनिवारी (दि.३१) संवाद साधण्यात आला. यावेळी कन्नड वतालुक्यातील नागापूर गावातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी आ. अंबादास दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहा असे आवाहन केले.
यावेळी भाजप पक्षाच्या नागापूर या गावातील शेख शकील, शेख अकील, विशाल खरात, रोहिदास गडवे, केदार चौथमल, अमोल उपडकर, विकास सोनवणे, दयानंद चौथमल, राजेश गडवे, संतोष सोनवणे, गणेश खरात, सागर जाधव, शेख शोएब, गौतम भालेराव या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठता जोपासण्याचे आवाहन केले.
यावेळी कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शिवसेना कन्नड तालुका प्रमुख केतन काजे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात आयोजित शिवसंपर्क मोहिम आयोजित करण्यात आली होती. निमित्ताने कन्नड तालुक्यातील धर्माचार्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज, शेलगाव, यांचे शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आशिर्वाद घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे छत्र सदैव सर्वसामान्य माणसासोबत – आ.अंबादास दानवे
- केंद्र सरकारचे उत्पन्न वाढले, जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ३३ टक्क्यांची वाढ
- ‘हम दो, हमारे दो की सरकार’, राहुल गांधींच्या मोदींना ‘फ्रेंडशिप डे’च्या खोचक शुभेच्छा
- एमपीएससीच्या रिक्त जागा तातडीने भरा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या; औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा संताप!
- …तर पुण्यातील दुकाने परस्पर संध्याकाळपर्यंत उघडी ठेऊ; व्यापारी महासंघाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
