🕒 1 min read
पुणे : ३१ जुलै तारीख उलटल्यानंतरही राज्य सरकारने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप भाजपने केलाय. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अजित पवारांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत सवाल विचारला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला काय? दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा चिमटा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे.
चित्रा वाघ यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुमच्याच नेत्यांच्या कार्यकाळात या नियुक्त्या रखडल्या आहेत ताई. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तारखेपूर्वीच नियुक्तीची नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. आता तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल. यावेळी गाणं मात्र हे हवं- ‘कर्म करो ऐसे भाई, पडे ना फिर पछताना’,’ असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
तुमच्याच नेत्यांच्या कार्यकाळात या नियुक्त्या रखडल्या आहेत ताई. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तारखेपूर्वीच नियुक्तीची नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. आता तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल. यावेळी गाणं मात्र हे हवं- "कर्म करो ऐसे भाई, पडे ना फिर पछताना".
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 1, 2021
काय म्हणाले होते अजित पवार?
दि.५ जुलै रोजी विधानसभेत पवार म्हणाले की, ‘मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली आहे. स्वप्निलने असे करायला नको होते, अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण, तो नाउमेद झाला असेल, त्याचा भ्रमनिरास झाला असेल. पण, काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!
- केंद्र सरकारचे उत्पन्न वाढले, जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ३३ टक्क्यांची वाढ
- ये भारत कि शान है… ; पी. व्ही. सिंधूने जिंकल कांस्यपदक !
- एमपीएससीच्या रिक्त जागा तातडीने भरा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या; औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा संताप!
- …तर पुण्यातील दुकाने परस्पर संध्याकाळपर्यंत उघडी ठेऊ; व्यापारी महासंघाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
