🕒 1 min read
नवी दिल्ली : मराठवाड्यातील शेती ही कायमच बेभरवश्याची राहिलेली आहे. त्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांपासून बचावासाठी मराठवाड्यात ‘एक्स-बँड रडार’ बसवण्याची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात डॉ. कराड यांनी जितेंद्र सिंह यांना मागणीचे पत्र दिले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज लक्षात आला तर तत्काळ उपाय-योजना करुन शेतीचे नुकसान टाळता येईल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून पर्जन्यमानाचा अचूक अंदाज व्यक्त करणे सहज शक्य होते. त्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल.
केंद्र सरकारच्या माध्यमातून चार रडार बसवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यातील एक रडार औरंगाबादमध्ये बसवण्याची मागणी डॉ. कराड यांनी केली आहे. या आधी देखील अजिंठा परिसरात हे रडार बसवण्याची मागणी करण्यात आली होती. तसे झाल्यास ढगफुटी सारख्या घटनेचा अंदाज आधीच व्यक्त करता येईल. त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान देखील टाळता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!
- केंद्र सरकारचे उत्पन्न वाढले, जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ३३ टक्क्यांची वाढ
- ये भारत कि शान है… ; पी. व्ही. सिंधूने जिंकल कांस्यपदक !
- एमपीएससीच्या रिक्त जागा तातडीने भरा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या; औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा संताप!
- …तर पुण्यातील दुकाने परस्पर संध्याकाळपर्यंत उघडी ठेऊ; व्यापारी महासंघाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
