औरंगाबाद : प्रेयसीच्या घरात जाऊन शिवसैनिकाने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना, गुरुवारी दौलताबाद परिसरात घडली. सुनील प्रकाश खजिनदार असे आत्महत्या केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव असून, प्रेमसंबंधातील भांडणातून हे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा होती.
शिवसेनेचे पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांचे दौलताबाद परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मागील माही वर्षांपासून प्रेम संबंध होते. ते त्या महिलेच्या घरी नेहमी ये-जा करीत असत, काही दिवसांपूर्वी खजिनदार यांचे लग्न जमले. हि माहिती त्यांच्या प्रियसीला कळली, मंगळवारी खजिनदार नेहमी प्रमाणे तिच्या घरी गेले. तिने त्यांना लग्नासंदार्भात त्यांना विचारणा केली, त्यावरून दोघात वाद झाला.
प्रेयसीला खजिनदार यांनी कुणाशीही लग्न करणे मान्य नसल्याने, परंतु त्यांचे लग्न जुळलेले असल्याचे त्यांनी तिला सांगितले. त्यानंतर खजिनदार यांनी तिच्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह घाटीत नेण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेत महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील पोलीस ठाण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


