🕒 1 min read
भोसरी : २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आली खरी मात्र आमदार लक्ष्मण जगताप, आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे या दोन आमदारांच्या समर्थकांचा गट आणि निष्ठावंत गट अशी विभागणी अंतर्गत भाजपमध्ये झाली. हा संघर्ष महापौर, उपमहापौर पदापासून ते स्थायी समितीच्या निवडणुकांपर्यंय वेळोवेळी दिसून आला आहे. महापालिकेच्या निवडणूका पुढील वर्षी येत असल्याने तिजोरीच्या किल्ल्या कोणाकडे जाणार यावरून कलगीतुरा रंगला होता.
आमदार महेश लांडगेंच्या गटातील नितीन लांडगे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली असली तरी अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने नाराजी उफाळून आली आहे. यात निष्ठावंत गटाचे प्रमुख नेते व बिनविरोध नगरसेवकपदी विराजमान झालेले रवी लांडगे यांचं नाव आघाडीवर आहे. २०१९ विधानसभेवेळी गावकी-भावकीच्या साक्षीने महेश लांडगे यांनी रवी लांडगे यांना स्थायी सभापतीचा शब्द दिला होता. मात्र, ऐनवेळी महेश लांडगे यांनी पलटी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे आता रवी लांडगे २०१९ मध्ये हुकलेल्या आमदारकीच्या संधीनंतर आता काय राजकीय पावले टाकणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
आता, रवी लांडगे यांनी शहरभर पोस्टरबाजी करत आपली काय चूक झाली ? असा सवाल केला आहे. या पोस्टरबाजीची चर्चा शहरासह राज्यभर होऊ लागली आहे. २०२२ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंर्तगत कलह भाजपला डोईजड ठरणार असल्याचं यामुळे दिसून येतंय.
‘चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय, हेच आमच्या कुटुंबाचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध केला, हे माझं चुकलं का?’ असा सवाल रवी लांडगे यांच्या या पोस्टरबाजीतून करण्यात आली आहे. यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांची होत असलेली कुचंबणा उघड्यावर पडली आहे.
कोण आहेत रवी लांडगे ?
निष्ठावंत गटाचे प्रमुख नेते व बिनविरोध नगरसेवक म्हणून रवी लांडगे यांची ओळख आहे. रवी लांडगे यांचे वडील हे दोन वेळा नगरसेवकपदी विराजमान झाले होते. तर, त्यांचे चुलते पै. अंकुशराव लांडगे हे पिंपरी-चिंचवड भाजपचे पहिले शहराध्यक्ष होते. दरम्यान, भोसरीमध्ये रवी लांडगे यांच्या रुपाने युवा नेतृत्व उभं राहण्याची चिन्हे आहेत. या भागातील भावकी देखील आता रवी लांडगे यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रवी लांडगे यांनी भविष्यात महेश लांडगे यांच्या विरोधात शड्डू ठोकून मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणतील असे म्हटले तर वावगे वाटण्याजोगे नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत लॅविश रहा, मात्र करोडोंचा खर्च स्वतः केला की सरकारी तिजोरीतून केला हे सांगा’
- राजू शेट्टींचा वीज बिलाप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम
- अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
