Share

IPL 2022 : ठरलं तर..! BCCIनं केली ‘प्लेऑफ्स’च्या वेळापत्रकाची घोषणा; ‘इथं’ रंगणार फायनल!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या प्लेऑफ्सच्या ४ सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे BCCIने जाहीर केली आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. क्वालिफायर-२ चा सामनाही अहमदाबादमध्ये २७ मे रोजी होणार आहे. त्याच वेळी, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-१ चे सामने अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्सवर होणार आहेत. सध्याच्या हंगामात १० संघ मैदानात उतरले आहेत. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व ७० सामने महाराष्ट्रात ४ ठिकाणी सुरू आहेत.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलच्या प्लेऑफ्सच्या सामन्यांबाबत माहिती दिली. बोर्ड समारोपाच्या तयारीत व्यस्त आहे. अहमदाबादमध्ये त्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. जय शाह यांनी महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेबाबतही मोठी घोषणा केली. कोरोनामुळे गेल्या हंगामात या  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

महिला टी-२० चॅलेंजचे सामने २३ ते २८ मे दरम्यान पुण्यात खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा हा चौथा हंगाम आहे. त्यात ३ संघ प्रवेश करतात आणि एकूण ३ सामने होतात. साखळी फेरीचे सामने २३ मे, २४ आणि २५ मे रोजी होणार आहेत. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. शेवटची स्पर्धा २०२० मध्ये खेळली गेली होती. ट्रेलब्लेझर्सचा संघ प्रथमच चॅम्पियन बनला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!