मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ४८वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुजरातने नऊपैकी आठ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाबचा संघ नऊपैकी चार सामने जिंकून आठव्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान पक्के करायचे आहे तर मयंक अग्रवालला हा सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत आपला संघ कायम ठेवायचा आहे.
गुजरात टायटन्स संघ आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क करून प्ले ऑफपासून फक्त एक पाऊल दूर आहे. फलंदाजीत संघाने अद्याप ठोस प्रयत्न केलेले नाहीत, पण असे असतानाही कधी ना कधी एखादा खेळाडू येऊन संघाला विजयापर्यंत नेतो. गुजरातचा युवा सलामीवीर शुबमन गिल फॉर्ममध्ये परतण्यास उत्सुक आहे. हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया हे त्रिकूट चांगली कामगिरी करत आहे. संघाने गोलंदाजीत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून धावा काढणे पंजाब किंग्जच्या फलंदाजांसाठी सोपे असणार नाही.
पंजाब किंग्जच्या फलंदाजीचा क्रम पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध संघाने १३३ धावा केल्या आणि सामना २० धावांनी गमावला. संघात फलंदाजीत अनेक मोठी नावे आहेत पण फलंदाजीत त्यांची कामगिरी दिसून आलेली नाही. कर्णधार मयंक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टो यांचा फॉर्मा सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडाला इतर वेगवान गोलंदाजांची साथ मिळत नाही.
दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


