🕒 1 min read
नवी दिल्ली : नेपाळमध्ये लग्नसोहळ्यासाठी पोहोचलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पबमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेते कॉंग्रेसवर टीका करत आहेत. या व्हिडिओत राहुल गांधी एका मुलबरोबर दिसत आहेत. ती मुलगी कोण आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लिहिले आहे की, नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी परदेशी सहली देशासाठी नवीन नाहीत. एक सामान्य नागरिक म्हणून काही हरकत नाही. पण जेव्हा एखादा खासदार, राष्ट्रीय राजकीय पक्षाचा कायम मालक जो इतरांना उपदेश करतो, तो करत असेल तर प्रश्न निर्माण होतील.
Regular Parties, Vacations, Holidays, Pleasure Trips, Private Foreign Visits etc are nothing new to the nation now.
As a private citizen there's no issue at all but when an MP, a permanent boss of a national political party who keeps preaching others….. https://t.co/r7bgkmHmvT— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 3, 2022
सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. ऋषी बागरी यांनी ट्विटरवर लिहिले की, राहुल गांधी काठमांडूमध्ये नेपाळमधील चीनच्या राजदूत हौ यांकी यांच्यासोबत पार्टी करत आहेत. दुसर्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, नेपाळ पर्यटनासाठी चीनचे राजदूत हौ यांकी मॉडेलिंग करत आहेत.
What a wonder!!!
A chinese Ambassador Hou Yanqi modelling in nepal for nepal tourism (2020) !!! ???? pic.twitter.com/hwkhsE0bmB— Rishi Bagree (@rishibagree) July 5, 2020
सोमवारी काठमांडू विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या तीन साथीदारांसह मॅरियट हॉटेलमध्ये थांबले. ते त्यांची नेपाळी मैत्रिण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. या संदर्भात सुमनिमाचे वडील आणि नेपाळचे म्यानमारमधील राजदूत भीम उदास म्हणाले, “आम्ही राहुल गांधींना माझ्या मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते.: मंगळवारी लग्नसोहळा होणार असून ५ मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

