Share

बीसीसीआयकडुन स्थानीक क्रिकेटच्या हंगामाची घोषणा, पगारवाढीचेही दिले संकेत

Published On: 

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली. यानंतर भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक स्पर्धापण युएईमध्ये हलवण्यात आली.

यानंतर बीसीसीआयने भारतात क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. या हंगामात महिला खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली करंडक, रणजी करंडक, विजय हजारे करंडक या स्पर्धांचा या वेळापत्रकात समावेश आहे. या हंगामात तब्बल २१२७ सामने खेळवण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार वाढवण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये जे खेळाडू २० पेक्षा अधीक सामने खेळले त्या खेळाडूंना ६० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात बीसीसीआय आहे. तर २० पेक्षा कमी सामने खेळणाऱ्या खेळाडुंना ४५ हजार रुपये पगार देण्याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. यासंदर्भात लवकरच सौरव गांगुली आणि जय शाह यांच्यात मुंबई येथे बैठक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!