Share

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी बायो बबल असेल की नाही? बीसीसीआयने दिली माहिती…; वाचा!

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणू येऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचा समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम झाला आहे. क्रिकेटचा खेळही यापासुन दूर राहिला नाही त्यामुळे खेळाडूंना बराच वेळ बायो-बबलमध्ये सामने खेळावे लागले. तथापि, कोरोनाचा प्रभाव काही काळ कमी होताना दिसत आहे आणि या कारणास्तव बीसीसीआय (BCCI) कडून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील बायो-बबल संदर्भात एक मोठे विधान आले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पुष्टी केली आहे की जूनमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या या टी-२० मालिकेत कोणताही बायो-बबल नसेल. मात्र, त्याअगोदर खेळाडूंसाठी कोविड चाचणी अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

बायो-बबलचा खेळाडूंच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. काही खेळाडू बराच काळ त्यात राहिल्यानंतर मानसिकदृष्ट्या थकलेले दिसले. तर इतर काही खेळाडूंनी काही काळ क्रिकेट खेळापासून दूरही राहण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांतील ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल ज्यामध्ये बायो-बबल नसेल.

जय शहा म्हणाले,
मी चुकीचा नसल्यास, बायो-बबल आयपीएल २०२२ साठी शेवटचा होता. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी खेळाडूंची चाचणी (कोविडसाठी) केली जाईल, परंतु बायो-बबल नसेल. खेळाडूंसाठी हे कठीण आहे. तथापि, हॉटेल बायो बबलमध्ये त्यांच्याकडे कुटुंबासारखे वातावरण आहे. आयपीएलच्या बाबतीत, आमच्याकडे प्रत्येक संघासाठी स्वतंत्र हॉटेल्स होती. तर स्पर्धा एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सर्व संघांची स्वतःची विश्रामगृहे, मनोरंजन केंद्रे होती. त्यामुळे त्यांनाही आनंद घेता आला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पाचही सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले जातील.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारतीय टी-२० संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!