मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) च्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या हंगामाचा चॅम्पियन रविवारी सापडेल. म्हणजेच आजच्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
यंदाचा आयपीएलचा हा १५वा हंगाम आहे. २००८ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सने जिंकला होता आणि आज ते त्यांचा दुसरा अंतिम सामना खेळणार आहेत. तेव्हापासून अनेक बदल झाले. अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत, तर अनेकांना संधी मिळाली नाही.
वृद्धिमान साहा पहिल्या हंगामापासून खेळत आहे
विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मासह काही खेळाडू पहिल्या हंगामापासून आतापर्यंत खेळत आहेत. परंतु त्यांना यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. यावेळी गुजरात आणि राजस्थान संघात हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. या दोघांच्या संघात एकच खेळाडू आहे, ऋद्धिमान साहा जो २००८ पासून आतापर्यंत खेळत आहे. हा यष्टिरक्षक फलंदाज गुजरात संघासाठी सलामी देत आहे. साहा यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
साहासोबत एक खास रेकॉर्डचही नातं
साहाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत केवळ एकच शतक झळकावले असून ते अंतिम सामन्यात आले होते. आयपीएल फायनलमध्ये शतक झळकावणारा साहा हा पहिला खेळाडू आहे. २०१४ च्या फायनलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पंजाब संघाकडून खेळला होता. तेव्हा साहाने नाबाद ११५ धावांची खेळी खेळली. मात्र पंजाब संघाला ही फायनल जिंकता आली नव्हती. आता साहा पुन्हा शतक झळकावेल आणि यावेळी संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
प्लेऑफमध्ये शतकं झळकावणारे खेळाडू
वीरेंद्र सेहवाग (पंजाब संघ) – १२२ धावा – क्वालिफायर-२ चेन्नई विरुद्ध, (२०१४)
शेन वॉटसन (चेन्नई संघ) – ११७* धावा – हैदराबाद विरुद्ध अंतिम सामना, (२०१८)
ऋद्धिमान साहा (पंजाब संघ) – कोलकाता विरुद्ध अंतिम सामन्यात ११५* धावा, (२०१४)
मुरली विजय (चेन्नई संघ) – ११३ धावा – दिल्ली विरुद्ध क्वालिफायर-२, (२०१२)
रजत पाटीदार (बेंगळुरू संघ) – ११२* धावा – एलिमिनेटर विरुद्ध लखनऊ, (२०२२)
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

