🕒 1 min read
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री या दोघांमध्ये भाषेवरून जोरदार वाद सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ आणि कन्नड अभिनेता ‘किच्चा सुदीप’ या दोघांमध्ये पहिल्यांदा भाषिक वाद सुरु झालं. या वादावर अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने देखील यामध्ये एन्ट्री घेतली आहे.
नुकताच रोहित शेट्टी एका कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी त्याला या भाषिक वादावर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत रोहित शेट्टी म्हणाला की, “बॉलिवूड कधीच संपू शकत नाही. जेव्हा तुम्ही इतिहास पहाल तेव्हा ६० च्या दशकात ‘प्यार किये जा’ हा चित्रपट आला होता. जो एक रिमेक होता. या चित्रपटमध्ये शशी कपूर देखील दिसले होते. आमच्याकडे ८० च्या दशकात जया प्रदा आणि श्रीदेवी या दोन सुपरस्टार दक्षिणेतील होत्या. अभिनेते जितेंद्र यांच्या काळातील ‘हिम्मतवाला’ ते ‘जस्टिस चौधरी’ आणि ‘मवाली’पर्यंत हे सर्व चित्रपट साऊथचे रिमेक होते.
बॉलिवूडबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाला की, “८० च्या दशकात जेव्हा व्हीसीआर आले, तेव्हा सगळे म्हणत होते की बॉलीवूड आणि थिएटर संपून जाईल. OTT आल्यावर सुद्धा लोक म्हणाले की, आता बॉलीवूड संपेल. माझा विश्वास आहे की ‘बॉलिवुड संपलं’ हा विचार एखाद्या नशेप्रमाणे आहे. पण प्रत्यक्षात बॉलिवूड कधीच संपणार नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
