Share

“२५०० कोटी रुपयांत मुख्यमंत्री…”, भाजप आमदाराचा खळबळजनक दावा

Published On: 

कर्नाटक : माजी खासदार आणि विजयपुरा शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी मला कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याबदल्यात त्यांनी मला २५०० कोटींची व्यवस्था करण्यास सांगितले होते, असा दावा केला आहे. भाजप आमदाराच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

याविषयी लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलत असताना यत्नल म्हणाले की,‘नवी दिल्लीमधील काही जण त्यांच्याकडे २५०० कोटी रुपये भरल्यास मुख्यमंत्री करतील अशी ऑफर घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते’, असे यत्नल म्हणाले.

दरम्यान, यत्नल यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच कर्नाटकात प्रत्येक कामासाठी दर ठरवले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!