मुंबई : काल (६ मे) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देशात ज्या प्रकारची राजवट सुरु आहे. त्यावरून वाटते की, देशात इंग्रजांची राजवट सुरु आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून ते म्हणाले आहेत की,‘सध्याच्या परिस्थिती पेक्षा इंग्रजांची राजवट बरी होती, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते सामनावीर संजय राऊत यांनी उधळलीत. सध्या आपण काय बोलतोय आणि काय करतोय. याचं भान त्यांना राहत नाही आहे. ब्रिटिशांची राजवट बरी म्हणून अपरोक्षपणे राऊतांनी देशाचा स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे.’
http://https://m.facebook.com/story.php?story_fbid=2079980585508945&id=234379736735715&sfnsn=wiwspwa
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सद्यस्थितीत शिवसेनेच्या आणि तिघाडी सरकारच्या घोटाळेबाजांवर कारवाई होत असल्याने राऊतांना सध्याच्या केंद्र सरकारबाबत आकस असणे साहजिकच आहे. बाकी राऊतांच्या पक्षाच्या सरकारचे आदर्श इंग्रजच असावेत, असे त्यांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून दिसतेय. अन्यथा केवळ हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला म्हणून एका पती-पत्नीविरोधात ब्रिटिशांनी दमनासाठी तयार केलेल्या राजद्रोहाच्या कलमाचा वापर केला नसता’, असेही उपाध्ये म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला”, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
- IPL 2022 PBKS vs RR : पंजाब किंग्जनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11
- तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बसमधून प्रवास; प्रवाशांशी साधला संवाद, म्हणाले…
- “राणा दाम्पत्याला आत टाकण्याची…”; किरीट सोमय्यांचा संजय पांडेंवर गंभीर आरोप
- “भाजप आणि मनसे धर्माचं राजकारण करत आहे”; रोहित पवारांचा अयोध्येतून आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

