मुंबई : अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने ५००० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम रचलाय. अविनाशने या स्पर्धेत १३:२५.६५ मिनिटांत ५ हजार मीटर अंतर पार करत बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.
सर्वात कमी वेळेत ३००० मीटर स्टीपलचेस पूर्ण करण्याचा विक्रम अविनाशच्या नावावर आहे. अविनाशने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८:१८.१२ वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये केलेला ८.२०.२०चा स्वत:चा विक्रम मोडला. परंतु त्याला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. त्या स्पर्धेत त्याने सातवे स्थान पटकावले होते.
Avinash Sable breaks the 30-year-old record of Bahadur Prasad in 5000 meter race, setting a new national record with a timing of 13:25.65 at the Sound Running Track meet in San Juan Capistrano, USA. Sable finished 12th in the meet.
(File photo) pic.twitter.com/bgqWhb6W7h
— ANI (@ANI) May 7, 2022
३० वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला अविनाश हा लष्कराचा शिपाई आहे. या २७ वर्षीय तरुणाने बहादुर प्रसादचा राष्ट्रीय विक्रम मोडला. बहादुरने १९९२मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेत १३:२९.७० मिनिटांत शर्यत पूर्ण केली होती.
New national record after 30 years! ????♂️????
???????? Olympian Avinash Sable breaks the long standing record of Bahadur Prasad (13:29.70) in 5000m!
He clocked 13:25.65 in Sound Running Track meet in San Juan Capistrano ????#Athletics | @Avinash3000m | @afiindia pic.twitter.com/lBruBDuuAK
— Olympic Khel (@OlympicKhel) May 7, 2022
भारतीय अॅथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, आम्ही अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस आणि ५००० मीटर शर्यतीत उतरवण्याची तयारी करत आहोत. दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा १० ते १५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या हांगझोऊ येथे होणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
अविनाश हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

