Share

१ हजार वर्षे जुनी बारव, सिल्लोड नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने आज झाली ‘अशी’ अवस्था!

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड येथे एक हजार वर्षे पुरातन बानेश्वर नामक मंदिरासमोर सुस्थितीत असलेली ऐतिहासिक बारव आहे. या बारवेत मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. काळाच्या ओघात पर्यायी जल साठे उपलब्ध झाल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. या बारवमध्ये नगरपरिषदेच्या मदतीने गणपती विसर्जन सुरू झाले. दरवर्षी गणेशोत्सव काळात नगर परिषद टेंडर काढते, बारव तात्पुरती स्वच्छ होते. व पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणून बारव प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, निर्माल्य, देवांचे फोटो आसपासच्या रहिवाशांकडून कचरा टाकून एकाच महिन्यात पूर्ण भरते. असे ३० वर्षांपासून सुरू आहे.

या बारव व मंदिराचा इतिहास अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक किरण पवार यांनी उजेडात आणला असून त्याचा माहीती फलक ही संस्थेने तिथे लावला .पवार यांनी बारव पुनर्जीवन करण्यासाठी तिथे गणपती विसर्जन न करता पर्यायी व कृत्रिम पाणवठा जो त्याच परिसरात असेल तिथे विसर्जन करावे तसेच त्या बारवेस संरक्षण जाळी बसवून त्यात कोणीही कचरा टाकणार नाही अशी व्यवस्था नगरपरिषदेने करावी या आशयाचे निवेदने व मागणी वारंवार केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे, पारगाव -भातोडी सारखाच हा ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन वारसा जतन व्हावा-सिल्लोड येथील यादवकालीन बारव व मंदिरास हजार वर्षे होत आहे. हा नैसर्गिक जलस्रोत अविरत झरत रहावा, निर्जल असावा, स्वच्छ ठेवावा. नगरपरिषदने त्यास संरक्षक जाळी बसवावी ही आमची ५ वर्षा पासून मागणी आहे. राज्य पुरातत्व विभागास व तहसीलदार यांना या स्थळाची वारसा स्थळ म्हणून नोंद व्हावी यासाठी अनेकदा पत्र व भेट दिली मात्र कोणताही प्रतिसाद या विभागाकडून मिळाला नाही. आतातरी प्रशासनाने वेळीच पावले उचलावी अशी मागणी अभिनव प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!