नवी-दिल्ली : प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या निवृत्तीनंतर अर्थातच जवळपास ३३ वर्षांपूर्वी राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुल येथे देण्यात आलेल्या जागेवर क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. परंतु पुढील ३ वर्षांत या जागेवरील बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू करण्याचे बंधन गावस्कर यांच्यावर घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट च्या माध्यमातून टीका केली आहे.
आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की,’गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा’ असेही ते म्हणाले.
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2021
दरम्यान, ‘जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्यांना आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता, ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले, त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला. स्टेडियममधून रडत बाहेर पडलो होतो’ असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती


