Share

संसद टीव्हीवरील ‘हे’ कार्यक्रम करणार शशी थरूर आणि प्रियंका चतुर्वेदी

Published On: 

नवी दिल्ली : ‘संसद टीव्ही’ या नवीन सरकारी वाहिनीचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वाहिनीवर टीव्ही शोंची जबाबदारी काँग्रेसचे शशी थरुर आणि शिवसेनेच्या प्रियंका चर्तुवेदी यांच्यासह अनेक खासदारांना देण्यात आल्या आहेत. ‘मेरी कहानी’ हा कार्यक्रम प्रियंका चर्तुवेदी करणार आहेत. तर शशी थरुर हे ‘टू द पॉइंट’ हा कार्यक्रम प्रसारित करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम राजकारणावर अधारित नसणार आहे.

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण करुन नव्याने सुरु झालेल्या संसद टीव्हीवर कोणते कार्यक्रम दाखवण्यात येतील याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. वेगवेगळ्या पक्षाचे विरोधी नेते नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. ते एकत्र आल्यावरही असेच आरोप करणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. मात्र विरोधी पक्षनेते एकत्र येत या शोच्या माध्यमातून विविध विकासकामे नव्या योजना यासंबंधी माहिती देणार आहेत.

कॉंग्रेसचे शशी थरूर यांना प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलाखतींची मालिका ‘टू द पॉइंट’ प्रसारित करण्यास सांगितले गेले आहे, तर प्रियंका चतुर्वेदी ‘मेरी कहानी’ या शोमध्ये महिला संसद सदस्यांची मुलाखत घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने संसद टीव्हीवर विविध कार्यक्रमांची तयारी सुरु केली आहे. तसेच संसद सदस्य, अधिकारी यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला शशी थरुर आणि प्रियंका चर्तुवेदी यांच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून हे दोन शो वाहिनी सुरु होताच दाखवले जाणार आहेत. तसेच माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह ‘एकम सत’ नावाच्या धर्मावर अधारीत मालिकेचे काम पाहतील. सरकारचे सार्वजनिक धोरण थिंक-टँक (NITI) आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत ‘ट्रानसफॅार्मिंग इंडिया’ या शोमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर अधारित कार्यक्रम प्रसारित करतील. सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल ‘इकोनॅामिक सूत्र’ ही मालिका प्रसारित करतील. यासह केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरण, आणि विकासात्मक प्रकल्पाबद्दल माहिती प्रसारित करण्यात येईल. असे संसद टीव्हीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आले आहे.

संसद टीव्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत कार्यक्रम प्रसारित करेल. विविध कार्यक्रमांत आजी माजी खासदारांना बोलावले जाईल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांना समान संधी देण्यात येतील. कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अधिवेशनाच्या काळात संसद टीव्हीचे दोन प्लॅटफॉर्म असतील. लोकसभा आणि राज्यसभेतील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपन एकसोबत केले जाईल. अधिवेशन नसेल तेव्हा एक वाहिनी बंद असेल तर दुसऱ्या वाहिनीवरुन बातम्या, शो, पॅनेल चर्चा दाखविण्यात येतील. असे सचिवालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!