Share

‘तो’ नियम मंत्रीमंडळालाही लागू करा, भाजपची मागणी

Published On: 

मुंबई : राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश मंजूर केला आहे. एकाच शासकीय विभागात पती-पत्नी जोडपे किंवा दोन मुलांना पदभार देण्यात येऊ नये, असे या अध्यादेशात नमुद आहे. दरम्यान  यावरूनच  ‘असा अध्यादेश अधिकाऱ्यांपुरताच मर्यादीत न ठेवता मंत्रीमंडळालाही लागू करा’, असा खोचक टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

‘फक्त अधिकाऱ्यांना कशाला मंत्रिमंडळालाही हे नियम लागू करा मुख्यमंत्री महोदय, कुटुंबातील दोघे एकाच ठिकाणी नको.’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी काढलेल्या अध्यादेशात सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत. आपल्या विभागात पती पत्नी किंवा त्यांचे मुले कार्यरत राहता कामा नये. यामुळे संबंधित  विभागात त्या कुटुंबाची मक्तेदारी तयार होईल आणि भ्रष्टाचार  वाढू शकतो. असे या अध्यादेशात नमुद करण्यात आले आहे.

तसेच सर्व विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना नियुक्ती व बदली देताना तपासून पाहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच कुणी एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याचा हट्ट करत असेल तर त्यांना हा आदेश दाखवावा असेही म्हंटले आहे. तर यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री मंडळातीलही कुटुंबाची मक्तेदारी बंद करून हा नियम लागू करावा असा खोचक टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!