Share

Ranji Trophy 2022 Final : महासामन्यात मुंबईनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

Published On: 

मुंबई : रणजी ट्रॉफी हे एक व्यासपीठ आहे जिथे भारतीय क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते आणि येथून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. रणजी ट्रॉफी २०२२चा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशला या सामन्यात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचायचा आहे, तर मुंबईच्या संघाला ४२ वेळा रणजी ट्रॉफी जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.

मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने दोन सामने जिंकले तर तीन सामने अनिर्णित राहिले. मध्य प्रदेशसाठी एक चांगले चिन्ह म्हणजे त्यांनी या हंगामातील रणजी करंडक स्पर्धेतील पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तर रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये मुंबईने ५ पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत.

मध्य प्रदेश संघाचे कर्णधारपद आदित्य श्रीवास्तवकडे आहे, तर मुंबईचे नेतृत्व भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉकडे आहे, ज्याने या मोसमात ३ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, मध्य प्रदेशच्या संघात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू रजत पाटीदारचा समावेश आहे. अशा स्थितीत तो संघासाठी चांगली खेळी खेळू शकतो. या मोसमात त्याने ५ सामन्यात ५०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या संघात युवा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय देखील आहे, ज्याने ५ सामन्यात सर्वाधिक २७ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईच्या सरफराज खानने यावेळी ५ सामन्यात ८०३ धावा केल्या आहेत. याच शम्स मुलानीने ५ सामन्यात ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई – पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सुवेद पारकर, सर्फराज खान, हार्दिक तामोर (विकेटकीपर), शम्स मुलानी, धवल कुलकर्णी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे.

मध्य प्रदेश – यश दुबे, हिमांशू मंत्री (विकेटकीपर), शुभम शर्मा, रजत पाटीदार, आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), अक्षत रघुवंशी, सरांश जैन, अनुभव अग्रवाल, गौरव यादव, कुमार कार्तिकेय, पार्थ साहनी.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!