Share

बापरे…! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट; पुढे काय झाले? पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका विरुध्द बांगलादेश या संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका रविवारी सुरू झाली. त्यामुळे सध्या श्रीलंकेचा कसोटी संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघातील पहिला सामना चट्टोग्राममध्ये खेळला जात आहे. पहिल्या डावात श्रीलंका संघासाठी अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस आणि आणि दिनेश चंदीमलने चांगले प्रदर्शन केले. मात्र सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या डावात एक अपघात झाला, पण सुदैवाने खेळाडूला कोणती गंभीर दुखापत झाली नाही.

ही घटना कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा वरच्या फळीतील फलंदाज कुसल मेंडिस खेळपट्टीवर खेळत होता. डावाच्या २४ व्या षटकात बांगलादेशचा ऑफ स्पिनर नईम हसन गोलंदाजीसाठी आला. याच षटकातील एका चेंडूवर मेंडिसने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॅट थेट मागे उभा असलेल्या यष्टीरक्षकाच्या डोक्याला लागली. मेंडिसने हा शॉट मारण्यासाटी बॅट जोरात घुमवली. फिरकी गोलंदाज असल्यामुळे यष्टीरक्षक यष्ट्याच्या जवळ उभा होता. परंतु मेंडिसच्या हे लक्षातही आले नाही आणि त्याची बॅट जोरात यष्टीरक्षकाच्या डोक्यात लागली.

यष्टीरक्षण करत असलेला बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास सुदैवाने त्यावेळी डोक्यावर हेलमेट घालून यष्टीपाठी उभा होता. अनेकदा यष्टीरक्षक हेलमेट न घालता देखील यष्टीरक्षण करताना दिसत असतात. पण दासचे नशीब चांगले, की या सामन्यात त्याने ही चूक केली नाही. त्याने हेलमेट घातले असल्यामुळे मेंडिसची बॅट जोराने डोक्यात लागल्यानंतर देखील त्याला कोणती गंभीर दुखातप झाल्याचे दिसले नाही. तो काही मिनिटे जमिनीवर झोपून नक्कीच राहिला होता, पण जास्त चिंतेची बाब नव्हती. बॅट लिटन दासच्या डोक्यात लागल्यानंतर खेळ काही मिनिटांसाठी थांबवला गेला, पण त्याच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला.

दोन्ही संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकाने ३९७ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला. पहिल्या डावात बांगलादेशने ६८ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात श्रीलंकाने ६ गडी गमावून २०३ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!