Share

“बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही…”; चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध करत सरकारची कोंडी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. काल पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी महाआरतीही केली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या.

राज ठाकरे म्हणाले, 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मोठी सभा घेणार आहोत, महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती त्याच मैदानावर सभा होणार आहे, तसेच 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय.

म्हणाले “कुणी कुठेही सभा घेतली तरी बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही. राज ठाकरे यांची औरंगाबादेत काहीच ताकद नाही. त्यामुळे सभेला यश येणार नाही. पाच हजार खुर्च्या ठेवल्या की मैदान भरल्यासारखे वाटते. सभेला लोक येणार नाहीत. सभेला दुसरेच लोक गाड्या लावतील आणि माणसं पाठवतील, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली”.

महत्वाच्या बातम्या – 

 

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!