Share

Eknath shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची ; बाजूला उभे राहणार चरणसिंग थापा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साजरा होणार आहे. सकाळपासूनच संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक यायला सुरुवात झाली आहे. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. मात्र आज संध्याकाळी कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरूनच खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी झाली असल्याचं आपण सकाळपासून पाहत आहोत. शिवतीर्थावर पोस्टर लावण्यात आलं असलं तरी कोणत्या प्रकारच्या खुर्च्या लावण्यात आलेल्या नाहीयेत. दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना आपल्याला दिसणार आहेत.

यात संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बीकेसी मैदानावर साजरा होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच बाजूला चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. चरणसिंग थापा हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जातात. काही दिवसांपूर्वीच चरण सिंग थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे

दरम्यान , शिवतीर्थावर लांबून लोक स्वतःच्या खर्चाने पोहचले असून आपल्यासोबत भाकरी देखील घेऊन आले आहेत. एवढंच नाही उद्धव ठाकरे हेच आम्हा शेतकऱ्यांचे खरे नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लोकं उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!