🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar ) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवार यांचं काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. असा संदर्भ देत पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? असा खोचक टोला केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी लगावला आहे.
१९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली. २०१४ मध्ये भाजप सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले.बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपसोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
दरम्यान यापूर्वी सदाभाऊ खोत यांनीही शरद पवारांवर निशाणा साधत त्यांनी आयुष्यभर आग लावण्याचे काम केले असल्याची टीका केली होती. आता केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? असा खोचक सवाल करत टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तर शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
IPL 2022 : काय वेळ आलीय..! चेन्नई-मुंबई गुणतालिकेत तळाशी; ‘हा’ संघ आहे पहिल्या स्थानी!
मनसेने शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून केला उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उद्यापासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार; तब्बल ५९ वर्षांनी मिळालाय सातारकरांना मान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
