Share

इंधन दरात कपात करण्याच्या मागणीबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले…

Published On: 

मुंबई : देशभरात सततच्या वाढत असलेल्या इंधन (Fuel) दरवाढीनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून पेट्रोल – डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. इंधनाचे दर कमी करण्याबाबत राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावरून भाजपने इंधनाचे दर कमी करण्याची मागणी जोर लावून धरली आहे.

महाराष्ट्र सरकारनेही व्हॅट व इतर करात कपात करण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे जीएसटीचे (GST) 50 हजार कोटी रुपये केंद्राने अद्याप दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)म्हणाले की, इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी केंद्राने अद्यापही दिले नाहीत. कोरोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इंधन दर कर कपात करण्याबाबत राज्याकडे उत्पन्नाच दुसरं साधन नसल्याने सध्या कर कपातीचा विचार नाही. येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे झाल्यास, किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!