मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. भाजपवर टीका करण्याची कोणतीच संधी विरोधक सोडत नाहीत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृषी कायदे रद्द करण्यावरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
आजची पहाट शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट ठरली आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला खोचक टोला लगावला आहे. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.
संजय राऊत किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलात तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय?, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2021
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेत शिवसेनेचा १०० कोटींचा घोटाळा, भाजपची चौकशीची मागणी
- प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य; वानखेडे धर्मामुळे अडचणीत येणार नाहीत, कारण….
- …पण तुम्ही सरकारचे बाप निघालात- गोपीचंद पडळकर
- एसटीच्या महिला कर्मचारी साडी-चोळी, नारळाने परिवहन मंत्र्यांची भरणार ओटी!
- रामदास कदमांचा पत्ता कट; शिवसेनेकडून ‘या’ २ नेत्यांना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी


