Share

नाशिकच्या पेठ आगारातील संपकरी बसचालकाची आत्महत्या

Published On: 

नाशिक : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु असून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अशातच राज्य सरकारने कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.आत्तापर्यंत संपात सहभागी झालेल्या २९७ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक(Nashik) जिल्ह्यातील पेठ आगारातील बसचालकाने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गहनीनाथ गायकवाड हे मूळचे मामावली (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवासी मागील पाच वर्षांपासून ते पेठ आगारात चालक म्हणून कार्यरत असल्याने पेठमधील सुलभानगर भागात वास्तव्यास होते. राज्य परिवहन महामंडळाच्या(State Transport Corporation) पेठ आगारातील चालक गहनीनाथ अंबादास गायकवाड (वय ३३) यांनी शनिवारी (ता. २०) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी सुरवातीपासूनच सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. संपामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर यापूर्वीही राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याचवेळी ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांचेही मोठे हाल झाले. मात्र, ना शासनाने दाद दिली, ना कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. त्यामुळे, संपाचा तिढा सुटता सुटेना, अशी स्थिती आहे. त्यातच शनिवारी घरी गॅस संपल्याचे गायकवाड यांना समजले. आर्थिक ओढाताणीने विमनस्क स्थितीतच आपल्या खोलीचे दार बंद करून, गळफास घेत आत्महत्या केली. त्या वेळी पत्नी व मुले बाहेरील खोलीत होते.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी पती दरवाजा का उघडत नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता गहनीनाथ यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!