मुंबई : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतल्यानंतर सर्वत्र आनंद साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही, अशी खंत देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
यानंतर भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते आणि अखेर हा कायदा मागे घेण्यात आला. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.
आंदोलन को यह मुकाम 700 किसानों की शहीदी देकर मिला है। किसान न इस बात को भूलेगा और न ही हुकूमत को भूलने देगा।#ANI #kisanandolan #SKM #PTI#Farmerprotest
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 20, 2021
- मात्र या आंदोलनादरम्यान ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले आहे. याबाबत ट्विट करत राकेश टिकैत यांनी लिहिले की, ‘७०० शेतकऱ्यांचे हौतात्म्य देऊन चळवळीने हा टप्पा गाठला आहे. ही गोष्ट ना शेतकरी विसरणार आहे ना सरकारला विसरणार आहे’, असे म्हणत राकेश टिकैत यांनी केंद्राला यांनी इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले ‘या’ गायिकेचे आभार
- व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल
- प्रत्येक चुकीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात जनतेला एकजुटीने उभे राहावे लागेल- संजय राऊत
- रत्नागिरीत रोजंदारीवर काम करणाऱ्या ८६ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

