Share

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा १०० कोटींचा घोटाळा, भाजपची चौकशीची मागणी

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेने १०० कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा केला आहे. सदरील निवीदा तत्काळ रद्द करुन याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी केली आहे. कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

आमदार कोटेचा म्हणाले, महापालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा (Vinod Mishra) यांनी महापालिका आयुक्तांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेंचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील असे कळविले होते.

१७ नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले आहे, असे कोटेचा यांनी सांगितले आहे.

तीन महिन्यांत निविदेची रक्कम १८९ कोटींनी वाढली
मिश्रा यांनी आयुक्तांना पत्र पाठवूनही महापालिका प्रशासनाने दक्षता घेतली नाही. २६ ऑगस्ट रोजी ट्रेंचिंगच्या कामांची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत ३८० कोटींची बोली सादर केली होती. मात्र १८ नोव्हेंबर रोजी ५६९ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या ३ महिन्यांत निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!