Share

‘खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध’; विक्रम गोखलेंचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : कंगना राणावतने (Kangana Ranaut) एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. यावरुन कंगनावर टीका केली जात आहे. असे असताना कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलं होते. यावरून विक्रम गोखले (Vikram Gokhal) यांच्यावरही प्रचंड टीका करण्यात आली.

विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत ‘खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे. मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतं की मी ठराविक लोकांच्या बाजूनं बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो, असं गोखले म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले,  ‘माझी मते मांडण्याचा मला अधिकार आहे आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे,’ अशी भूमिका विक्रम गोखले यांनी घेतली. माझी आणि कंगनाची अजिबात ओळख नाही, पण माझा राजकीय अभ्यास दांडगा आहे, असा दावा करून त्यांनी कंगनाने केलेले वक्तव्य योग्य असल्याचा पुनरुच्चार केला. १८ मे २०१४ रोजीचा ‘द गार्डीयन’चा अंक वाचा. जे त्यात म्हटले आहे तेच कंगनाने सांगितले. ती काहीही चुकीचे बोलली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘देश भगवा राहील, हिरवा होणार नाही’ या आपल्या विधानाचे समर्थन करताना ते म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेवर आपला विश्वास आहे, मात्र खोट्या धर्मनिरपेक्षतेबाबत चीड आहे. धर्म ही संकल्पनाच वाईट आहे, ती बाजूला ठेवून लोकांशी सुसंवाद साधावा अशी अपेक्षा असते. आपल्याकडचे अतिबुद्धिजीवी मात्र खोट्या धर्मनिरपेक्षतेचे अनुसरण करतात,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!