मुंबई : कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.त्यानंतर ती सातत्याने कंगणा कोणत्यान कोणत्या वादात सापडत आहे, आता पुन्हा एकदा ती नव्याने चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये आपली बदनामी केली असल्याचा दावा जावेद अख्तर केला होता. जावेद अख्तर यांनी कंगना राणावत विरोधात अंधेरीच्या न्यायालयात हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगना रणौतविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टानं कंगनाला समन्स जारी करत 1 मार्चच्या सुनावणीत हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. मात्र कंगना य सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टानं कंगनाविरोधात ही दंडात्मक कारवाई केली आहे.
कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी सोमावरी कोर्टाला सांगितलं की, कंगना ही सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे, तसेच काही वैयक्तिक कारणास्तव ती या सुनावणीस हजर राहू शकली नाही. त्यामुळे कंगनापुढे यासंदर्भात आता अंधेरी दंडादिकारी कोर्टात हजर राहून रितसर जमीन घेणं किंवा या वॉरंटच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणं हे दोन कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. कोर्टानं याप्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्चला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी
- ‘आप’चे अनोखे आंदोलन, नाल्यावर पालिकेचा दशक्रिया करून पिंडदान
- खाजून आवधान! जामीन मिळताच फिर्यादीच्या घरासमोर फोडले फटाके, पुन्हा ॲट्रॉसिटी दाखल
- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
