Share

Breaking News | हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट; बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स

Published On: 

रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरील समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीत तीन AK-47 आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही बोट स्थानिक मच्छिमाराला दिसली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बोट खेचून किनाऱ्यावर आणली आणि तपास सुरु केला. बोटीत एक मोठा बॉक्स होता, ज्यात तीन एके-47 आणि गोळ्या सापडल्या. या गोळ्या निळ्या आणि लाल रंगाच्या छोट्या पेटीत ठेवल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बॉक्समध्ये शस्त्रे ठेवण्यात आली होती, त्यावर इंग्रजीमध्ये नेपच्यून मेरीटाइम सिक्युरिटी असे लिहिले आहे. ही कंपनी ब्रिटनची असल्याचे सांगितले जाते. पोलीस या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिक माहिती घेत आहेत. या बोटीच्या मालकाशी संपर्क झाला आहे. दुबईतील एका सुरक्षा एजन्सीने सांगितले की या बोटीतील शस्त्रे त्यांचीच आहेत. ती गायब झाली होती. तसेच ही शस्त्रे बोटीवरील क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचे या एजन्सीने स्पष्ट केले आहे.

दहशतवादी कट नसण्याची शक्यता
या शिवाय भरडखोलमध्ये एक लाईफबोटही सापडली आहे. हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यापासून ते 32 किमी अंतरावर आहे. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा दहशतवादी कटही असू शकतो. या बोटीमागे काय उद्देश आहे, हि नक्की कुठून आली हे आम्ही तपासणार आहोत. तर पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कट असण्याची शक्यता नाकारली आहे. दरम्यान स्थानिक लोकांची चौकशी केली जात आहे. यासोबतच संपूर्ण रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या सर्व भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ही घटनास्थळी पोहोचले असून हे पथक पुढील तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!