मुंबई : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरील समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीत तीन AK-47 आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही बोट स्थानिक मच्छिमाराला दिसली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बोट खेचून किनाऱ्यावर आणली आणि तपास सुरु केला. बोटीत एक मोठा बॉक्स होता, ज्यात तीन एके-47 आणि गोळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा मुद्दा सध्या सुरु असेलल्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
संशयास्पद बोटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक निवेदन सादर केले. ज्यात त्यांनी बोटीबद्दल मिळालेली प्राथमिक माहिती सांगितली. फडणवीसांनी सांगितले कि, “ही बोट निदर्शनास आल्यापासूनच किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आलेत. तसेच रायगडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितानुसार, या बोटीचे नाव लेडी हान असून हि बोट हाना लाँडर्सगन या ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. हाना यांचे पती जेम्स हार्बर्ट हे या बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपला जाणार होती. मात्र या अचानक बोटीचे इंजिन निकामी झाले. बोटीवरील खलाशांनी मदतीसाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तर 26 जून रोजी एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका करून त्यांना ओमानला पाठवण्यात आले. मात्र त्यावेळी समुद्र खवळलेला असल्याने या बोटीचे टोइंग करता आले नाही आणि त्याचमुळे समुद्राच्या प्रवाहामुळे भरकटत भरकटत ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली.”
तर पुढे फडणवीसांनी असंही सांगितलं कि, “सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना आणि इतर तपास यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक करत आहे. तसेच भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय तपास यंत्रणांही लक्ष ठेवून आहेत.”
दहशतवादी कट नसण्याची शक्यता
पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कट असण्याची शक्यता नाकारली आहे. दरम्यान स्थानिक लोकांची चौकशी केली जात आहे. यासोबतच संपूर्ण रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट देण्यात आला असून समुद्र किनाऱ्यालगतच्या सर्व भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ही घटनास्थळी पोहोचले असून हे पथक पुढील तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Breaking News | हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट; बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स
- Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य
- Assembly Session 2022 | महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले – छगन भुजबळ
- BJP । भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार
- Monsoon session | “आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी”; भुजबळांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

