Share

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख काय म्हणाला ‘झुंड’ चित्रपटा विषयी…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. आता या चित्रपटावर प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं प्रतिक्रिया दिली आहे. रितेशनं ‘झुंड’ चित्रपटासाठी केलेलं ट्वीट सध्या खूप चर्चेत आहे. ‘झुंड’ पाहिल्यानंतर रितेशनं त्याच्या ट्विटरवर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट केली आहे. यासोबतच त्यानं हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच जाऊन पाहावा असा आग्रह देखील केला आहे. रितेशनं लिहिलं, ‘स्वतःवर थोडी दया करा आणि ‘झुंड’ चित्रपट कृपया चित्रपटगृहात जाऊन पाहा. नागराज मंजुळे देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो, आनंद देतो, वेदनांचा अनुभव देतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुम्हाला समाजातील भिंतीने विभागलेल्या दोन भारतांचा विचार करायला लावतो.’

तसेच अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!