जालना : भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांला चांगलेच झापताना बबनराव लोणीकर दिसून येत असल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे.
बबनराव लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू अशी धमकी दिल्याचं या कथित ऑडियो क्लिपमध्ये प्रथमदर्शनी ऐकायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टिप मिळाली होती यानंतर हा कॉल केला गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. मात्र त्यांना छापेमारीत काहीच आढळून आलं नाही. संबंधित व्यापाऱ्याने घडलेली सर्व कैफियत भाजप नेते बबनराव लोणीकरांसमोर मांडली. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचं सांगण्यात येत आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- अदानी कोळसा खाणीला कर्ज दिल्यास…अमुंडीने दिला एसबीआय गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा !
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- ‘पहिल्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा शूटिंगला सुरूवात करणार’
- कॉंग्रेसचा हात सोडणाऱ्या उर्मिला मातोंडकर उद्या बांधणार मनगटावर शिवबंधन ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

