मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे माध्यमांमध्ये चर्चेत असतं. तर अभिनेत्री अनुष्का गर्भवती आहे. ती आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत आहे.
यासाठी तिचा पती विराट कोहलीदेखील खूप काळजी घेत आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असला तरी तो बाळंतपणाच्यावेळी तो अनुष्कासोबत असणार आहे. प्रेग्नेंसी काळा दरम्यान देखील हे कपल नेहमीच त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमुळे चर्चेत राहिले आहे.
अनुष्का सध्या ‘एंडोर्समेंट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि कोविड -१९च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून तिचे काम पार पाडत आहे. याबद्दल बोलताना अनुष्का म्हणते की, या शूटिंग नंतर ती मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेणार असून त्यानंतर ती आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती शूटिंगमध्ये परत येईल आणि घर, मूल आणि व्यावसायिक जीवन यांच्यात सुसंवाद साधेल.
अनुष्का म्हणाली,’सेटवर आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि पुढचे काही दिवस मी शूटिंग सुरुच ठेवणार आहे. त्यानंतर माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर मी पुन्हा शूटिंगवर परत येईन आणि माझे घर, बाळ आणि व्यावसायिक गोष्टी यांच्या सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. कारण अभिनय केल्याने मला खरोखर आनंद मिळतो.’ अशी प्रतिक्रिया तीन दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘3 वर्षांपर्यंत कोविड सेस लावा’, केंद्र सरकारला मिळाल्या अनोख्या सूचना !
- मराठा आरक्षण : फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्यांना नावं ठेवली : उदयनराजे भोसले
- ‘लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत’ – पृथ्वीराज चव्हाण
- ‘संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा’; नितेश राणेंचा दावा
- पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन : उदयनराजे भोसले


