नवी दिल्ली : एसबीआयकडून ऑस्ट्रेलियामधील अदानी कॅरमीशियेल औष्णिक कोळसा खाणीसाठी कर्ज देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कार्बनचे उत्सर्जन वाढणार असल्याने यापूर्वीच पर्यावरणप्रेमींनी कोळसा प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
जागतिक महामारी आणि हवामानाची गंभीर समस्या असताना अदानी कोळसा खाणीला कर्ज मंजूर करणे ही खूप मोठी जोखीम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमुंडी ही युरोपमधील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक (असेट मॅनेजर) कंपनी आहे. या कंपनीचा मालमत्ता व्यवस्थापनात जगातील पहिल्या दहामध्ये समावेश आहे.
एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी जगभरातून प्रयत्न करण्यासाठी संस्था, करार केले जातात. ज्यामध्ये पॅरिस करार याचा उल्लेख करता येईल. मात्र औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने फ्रान्सची कंपनी अमुंडीने अदानी कोळसा खाणीवरून स्टेट बँक ऑफ इंडियाला गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला ५ हजार कोटींचे कर्ज देवू, नये, असे अमुंडी कंपनीने स्पष्ट म्हटले आहे.
डायरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशनल कॉर्पोरेट क्लाईंट डिव्हीज आणि ईएसजीचे जीन जेकस बार्बरीस म्हणाले, की स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला कर्ज देवू नये, असे वाटते. जर त्यांनी कर्ज दिले तर आम्ही तत्काळ गुंतवणूक काढून घेवू, असा त्यांनी इशारा दिला आहे.
पुढे ते म्हणाले, की कोळसा खाणींना कर्ज देणे हे पूर्णपणे विसंगत आहे. कारण एसबीआयमधील ग्रीन बाँडमध्ये गुंतणूक झाली आहे. स्टेट बँकेला कर्ज देण्यात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळविले आहे. सध्या, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहोत.
महत्वाच्या बातम्या
- ‘3 वर्षांपर्यंत कोविड सेस लावा’, केंद्र सरकारला मिळाल्या अनोख्या सूचना !
- मराठा आरक्षण : फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्यांना नावं ठेवली : उदयनराजे भोसले
- ‘लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत’ – पृथ्वीराज चव्हाण
- ‘संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा’; नितेश राणेंचा दावा
- पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन : उदयनराजे भोसले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

