Share

शिवसेनेतील आयारामांना पक्षाची शिस्त काय माहित, खैरेंचा सत्तारांना टोला

Published On: 

औरंगाबाद : मी शिवसेनेचा तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनेतील आयारामांना पक्षाची शिस्त काय माहित असा टोला शिवसेनेचे माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना शहरातील एका पत्रकार परिषदेमध्ये लगावला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये आज माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उतरले आहेत. तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी शिवसेनेमध्ये मी गेली ३५ वर्षे काम करतोय. बाळासाहेबांची तसेच शिवसेनेची काय शिस्त असते ते मला माहिती आहे. पण जे लोक पक्षामध्ये नवीन आले आहेत. त्यांना शिवसेनेची शिस्त, नियमावली देखील माहिती नाही. तर त्यांच्यासाठी मी अनेक बैठका देखील घेणार असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना या वेळी सांगितले. या वेळी शेतकरी सहकार बँक विकास पॅनेल हे अधिकृत महाविकास आघाडीचे पॅनल असल्याचेही त्यांनी या ‌वेळी सांगितले.

आम्ही शिवसेनेमध्ये कार्यकर्ता ते मंत्री, आमदार, खासदार देखील झालो आहे. मी औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा पातळीवरील काम केलेले आहे. मी लोकसभेमध्ये असताना मी अनेक मोठ – मोठे विषय संसदेत मांडले देखील आहे. तर शिवसेना या पक्षांची शिस्त काय आहे, हे मी आता लवकरच महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार असल्याचे देखील त्यांनी या वेळी सांगतले. दरम्यान शिवसेनेचे काही मंत्री, आमदार हे विरोधी पक्षामध्ये बँकेच्या निवडणुकीत काम करत आहेत. तर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री संदीपान भुमरे,  मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे,  सतिष चव्हाणसह आदींनी एकत्र येत शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. याचाच धागा पकडून खैरे हे बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!